Corona Update India : भारतातील दैनंदिन करोनाबाधितांची संख्या स्थिर, रिकव्हरी रेट ९७.३१ टक्क्यांवर

Corona Update India : भारतातील दैनंदिन करोनाबाधितांची संख्या स्थिर, रिकव्हरी रेट ९७.३१ टक्क्यांवर
Corona Update

दिल्ली l Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने करोनाची दुसरी लाट आता बर्‍यापैकी नियंत्रणात आली आहे. भारतात गेल्या दोन दिवसांपासून नवीन करोना बाधितांच्या संख्येची स्थिती स्थिर आहे. देशात दररोज करोनाची सुमारे ४० हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३८ हजार ०७९ नवे करोना रुग्ण (New Covid19 Patient) आढळले असून ५६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ४३ हजार ९१६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या चार लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. देशात अद्याप ४ लाख २४ हजार करोनाबाधित उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण ४ लाख १३ हजार ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. चांगली गोष्ट अशी की आतापर्यंत एकूण ३ कोटी २ लाख २७ हजार लोकांनी करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत तीन कोटी १० लाख ६४ हजार लोकांना करोना संसर्ग झाला आहे.

सध्याचा देशाचा रिकव्हरी रेट ९७.३१ टक्क्यांवर पोहचला आहे. देशाचा आठवड्याचा आणि दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. भारताचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.१० टक्के इतका आहे. तर दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट १.९१ टक्के इतका आहे. मागील २६ दिवसांपासून भारताचा दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com