Corona Update : देशातील रुग्णसंख्येत चढ उतार सुरूच; जाणून घ्या गेल्या ताजी आकडेवारी
Corona Update India

Corona Update : देशातील रुग्णसंख्येत चढ उतार सुरूच; जाणून घ्या गेल्या ताजी आकडेवारी

महाराष्ट्रातील स्थिती? (Corona update maharashtra)

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या (COVID19) आकडेवारीत चढ-उतार दिसत आहे. यामुळे करोनाचे संकट (Coronavirus crisis) अद्याप देशभर कायम आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात करोनाचे (New corona patient today) २३ हजार ५२९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर, २८ हजार ७१८ जणांनी करोनावर मात केली आहे. तसेच ३११ जणांचा करोनामुळे मृत्यू (COVID19 death) झाला आहे.

आतापर्यंत देशात एकूण ३ कोटी ३७ लाख ३९ हजार ९८० जणांना करोनाची लागण (Corona total patient) झाली आहे. तसेच देशात सध्या २ लाख ७७ हजार ०२० सक्रीय रुग्ण (Corona active cases) आहेत. तर ३ कोटी ३० लाख १४ हजार ८९८ जणांनी आतापर्यंत करोनावर मात केली आहे. तर करोनामुळे ४ लाख ४८ हजार ०६२ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान केरळमध्ये पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून बुधवारी १२ हजार १६१ रुग्णांची भर पडली तर १५५ जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये काल १७ हजार ८६२ रुग्ण करोनामुक्त झाले.

देशात सुरु असलेल्या लसीकरणाने (corona vaccination in india) आता वेग पकडायला सुरुवात केली आहे. देशभरात गेल्या २४ तासांत ६५ हजार ३४ लाख ३०६ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यामुळे देशातल्या लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या ८८ कोटी ३४ लाख ७० हजार ५७८ झाली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती? (Corona update maharashtra)

महाराष्ट्रात काल दिवसभरात ३ हजार २५३ रूग्ण करोनामधून बरे झाले असून, ३ हजार १८७ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, ४९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ६८ हजार ५३० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com