Coronavirus : देशात करोनाची काय आहे स्थिती?, वाचा आजची आकडेवारी

Coronavirus : देशात करोनाची काय आहे स्थिती?, वाचा आजची आकडेवारी

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, देशात आता करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात १६ हजार ३२६ जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७३ हजार ७२८ वर पोहोचली.

देशातील एकूण करोना संक्रमितांची संख्या ३ कोटी ४१ लाख ५९ हजार ५६२ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात ६६६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख ५३ हजार ७४२ इतकी झाली आहे.

तसेच आतापर्यंत भारतात १ अब्ज १ कोटी ३६ लाख ३७ हजार ४३१ करोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. देशातील ७१ कोटी ४० लाख ८४ हजार १३३ जणांना लसचा पहिला डोस तर २९ कोटी ९५ लाख ५३ हजार २९८ जणांना लसचा दुसरा डोस टोचण्यात आला.

दरम्यान केरळमध्ये २२ ऑक्टोबरपर्यंत करोना मृत्यूंची संख्या २७ हजार ७६५ इतकी झालीय. हा आकडा केरळने मागील आकडेवारीतील ५६३ मृत्यू समाविष्ट केल्यानंतर झालेत.

२१ ऑक्टोबरला केरळ सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार करोना मृत्यूंची एकूण संख्या २७ हजार २०२ इतकी होती. शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) ९९ मृत्यूंची नोंद झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com