Corona Update : भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत चढउतार सुरुच, आज ‘इतक्या’ रुग्णांची नोंद

महाराष्ट्रातील स्थिती काय?
Corona Update : भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत चढउतार सुरुच, आज ‘इतक्या’ रुग्णांची नोंद

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा कहर पाहायला मिळत असून दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत देशामध्ये ४३ हजार २६३ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन करोना रुग्णांची संख्या ३ लाख ९३ हजार ६१४ झाली आहे. तर देशातील एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी ३१ लाख ३९ हजार ९८१ इतकी झाली आहे.

तसेच गेल्या २४ तासात ४० हजार ५६७ जणांनी करोनावर मात केली असून ३३८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी २३ लाख ०४ हजार ६१८ जणांनी करोनावर मात केली असून ४ लाख ४१ हजार ७४९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे करोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असून, रिकव्हरी रेट हा ९७.४८ टक्के इतका झाला आहे.

देशातील दररोजच्या करोनाबाधितांच्या एकूण संख्येपैकी सर्वाधिक रुग्णसंख्या ही केरळमधून समोर येत आहे. एकट्या केरळमध्ये बुधवारी ३० हजार १९६ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर १८१ जणांचा मृत्यू झाला. केरळ मधील करोनाबाधितांची ही संख्या देशातील एकूण रुग्णसंख्येच्या ७० टक्क्यांहून अधिक आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Corona cases in maharashtra)

महाराष्ट्रात काल दिवसभरात ४ हजार १७४ नवीन करोनाबाधितांची रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात बुधवारी ४ हजार १५५ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ०८ हजार ४९१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९७.०९ टक्के आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com