दिलासादायक! देशात नव्या रुग्णांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली, वाचा आजची आकडेवारी

दिलासादायक! देशात नव्या रुग्णांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली, वाचा आजची आकडेवारी

दिल्ली | Delhi

देशात करोना रुग्णांच्या घसरणीचा वेग कायम आहे. सलग काही दिवसांपासून संख्या घटत असून त्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. मात्र धोका संपलेला नाही इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत देशामध्ये २७ हजार २५४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन करोना रुग्णांची संख्या ३ लाख ७४ हजार २६९ झाली आहे. तर देशातील एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी ३२ लाख ६४ हजार १७५ इतकी झाली आहे.

तसेच गेल्या २४ तासात ३७ हजार ६८७ जणांनी करोनावर मात केली असून २१९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी २४ लाख ४७ हजार ०३२ जणांनी करोनावर मात केली असून ४ लाख ४२ बाजार ८७४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत ७४ कोटी ३८ लाख ३७ हजार ६४३ डोस देण्यात आले आहेत. गेल्या २४ तासात ५३ लाख ३८ हजार ९४५ जणांना लस देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती?

राज्यात काल दिवसभरात ३ हजार ६२३ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, २ हजार ९७२ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याशिवाय, ४६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. अजुनही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com