Corona Update : देशात दैनंदिन रुग्णांसह सक्रिय रुग्णसंख्येतही घट, महाराष्ट्रातील सद्यस्थिती काय?

Corona Update : देशात दैनंदिन रुग्णांसह सक्रिय रुग्णसंख्येतही घट, महाराष्ट्रातील सद्यस्थिती काय?

दिल्ली | Delhi

देशात करोना रुग्णांच्या घसरणीचा वेग कायम आहे. सलग पाच दिवसांपासून संख्या घटत असून त्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. मात्र धोका संपलेला नाही इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत देशामध्ये २५ हजार ४०४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन करोना रुग्णांची संख्या ३ लाख ६२ हजार २०७ झाली आहे. तर देशातील एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी ३२ लाख ८९ हजार ५७९ इतकी झाली आहे.

तसेच गेल्या २४ तासात ३७ हजार १२७ जणांनी करोनावर मात केली असून ३३९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी २४ लाख ८४ हजार १५९ जणांनी करोनावर मात केली असून ४ लाख ४३ हजार २१३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.५८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर गेल्या ८१ दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचा साप्ताहिक दर सातत्याने ३ टक्क्यांच्या खालीच आहे.

केरळात किती करोनाग्रस्त?

केरळातील करोनाबाधितांच्या नव्या रुग्णांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. केरळात सोमवारी करोनाच्या १५ हजार ०५८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. ज्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढून ४३ लाख ९० हजार ४८९ झाली आहे. तसेच करोनामुळे आणखी ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत केरळात करोनामुळं २२ हजार ६५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात काल (मंगळवारी) २ हजार ७४० नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार २३३ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ०९ हजार ०२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के आहे. तसेच राज्यात काल (मंगळवारी) २७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. राज्यात सध्या ४९ हजार ८८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com