Corona Update : देशात नव्या करोनाग्रस्तांमध्ये घट, मात्र सक्रिय रुग्णसंख्या तीन लाखांवर

Corona Update : देशात नव्या करोनाग्रस्तांमध्ये घट, मात्र सक्रिय रुग्णसंख्या तीन लाखांवर

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या (COVID19) आकडेवारीत चढ-उतार दिसत आहे. यामुळे करोनाचे संकट (Coronavirus crisis) अद्याप देशभर कायम आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात करोनाचे (New corona patient today) २८ हजार ३२६ नवे रुग्ण आढळले आहेत. तर, २६ हजार ३२ जणांनी करोनावर मात केली आहे. तसेच २६० जणांचा करोनामुळे मृत्यू (COVID19 death) झाला आहे.

आतापर्यंत देशात एकूण ३ कोटी ३६ लाख ५२ हजार जणांना करोनाची लागण (Corona total patient) झाली आहे. तसेच देशात सध्या ३ लाख ०३ हजार ४७६ सक्रीय रुग्ण (Corona active cases) आहेत. तर ३ कोटी २९ लाख ०२ हजार ३५१ जणांनी आतापर्यंत करोनावर मात केली आहे. तर करोनामुळे ४ लाख ४६ हजार ९१८ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात सुरु असलेल्या लसीकरणाने (corona vaccination in india) आता वेग पकडायला सुरुवात केली आहे. देशभरात गेल्या २४ तासांत ६८ लाख ४२ हजार ७८६ जणांचं लसीकरण करण्यात आलंय. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ८५ कोटी ६० लाख ८१ हजार ५२७ लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय.

महाराष्ट्रातील स्थिती? (Corona update maharashtra)

महाराष्ट्रात शनिवारी दिवसभरात ३ हजार ७२३ रूग्ण करोनामधून बरे झाले असून, ३ हजार २७६ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, ५८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ६० हजार ७३५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५ लाख ४१ हजार ११९ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १ लाख ३८ हजार ८३४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com