COVID19 : करोना हरतोय! देशात सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट, आज किती रुग्णांची नोंद?

COVID19 : करोना हरतोय! देशात सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट, आज किती रुग्णांची नोंद?

दिल्ली l Delhi

संपूर्ण जगात करोनाचा (COVID19) शिरकाव झाल्यापासून करोनाने भारतातही कहर माजवला होता. जगात सर्वात जास्त रुग्ण असणाऱ्या काही देशात भारताचा समावेश होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या (COVID19) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. (Corona active patient)

देशात गेल्या २४ तासांत ११ हजार ९१९ रुग्णांची नोंद (Coronavirus news patient) करण्यात आली आहे. तर, ११ हजार २४२ बाधित करोनातून बरे झाले असून ४७० जणांचा मृत्यू (COVID19 death) झाला आहे.

देशातील एकूण बाधितांपैकी ३ कोटी ३८ लाख ८५ हजार १३२ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. तर देशात आतापर्यंत ४ लाख ६४ हजार ६२३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या देशात १ लाख २८ हजार ७६२ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत.

तसेच देशभरात करोनावर प्रतिबंधक लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. आतापर्यंत ११४ कोटी ४६ लाख ३२ हजार ८५१ जणांना लस दिली आहे. गेल्या २४ तासात ७३ लाख ४४ हजार ७३९ जणांना लस देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com