COVID19 : देशात पुन्हा वाढताय करोना रुग्ण, महाराष्ट्रासह 'या' पाच राज्यांना केंद्राचा अलर्ट... आज किती रुग्णांची नोंद?

COVID19 : देशात पुन्हा वाढताय करोना रुग्ण, महाराष्ट्रासह 'या' पाच राज्यांना केंद्राचा अलर्ट... आज किती रुग्णांची नोंद?

दिल्ली | Delhi

देशात करोना (corona update) प्रकरणांमध्ये घट झाल्याच्या काही आठवड्यांनंतर आता पुन्हा एकदा करोनाने (covid19) डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे.

गेल्या २४ तासात २ हजार ०६७ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर तर ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन मृत्यूंसह देशातील मृतांची संख्या ५ लाख २१ हजार ९६५ इतकी झाली आहे. सध्या देशातील सक्रीय करोना रुग्णांची संख्या ११ हजार ५४२ इतकी झाली आहे.

COVID19 : देशात पुन्हा वाढताय करोना रुग्ण, महाराष्ट्रासह 'या' पाच राज्यांना केंद्राचा अलर्ट... आज किती रुग्णांची नोंद?
पांढरी साडी अन् साधा भोळा अंदाज, पाहा 'आर्ची'चे खास फोटो

दरम्यान काल देशात १ हजार ५४७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत ४ कोटी २५ लाख १३ हजार २४८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन करोना संसर्गाचा दर ०.४९ टक्के इतका आहे. तसेच सध्याचा रिकव्हरी रेट ९८.७६ टक्के असून आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.३८ टक्के आहे.

COVID19 : देशात पुन्हा वाढताय करोना रुग्ण, महाराष्ट्रासह 'या' पाच राज्यांना केंद्राचा अलर्ट... आज किती रुग्णांची नोंद?
गुलाबाची कळी....! प्राजक्ता माळी गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय झक्कास

केंद्राने महाराष्ट्रासह पाच राज्यांना केले अलर्ट

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मिझोराम या राज्यांना पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये सतत वाढणाऱ्या करोना सकारात्मकतेच्या दराचा उल्लेख करण्यात आला आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करत आरोग्य मंत्रालयाने याबाबत आवश्यक पाऊलं उचलण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय राज्यांनाही सतर्क राहण्याचा सूचना ही देण्यात आल्या आहेत.

COVID19 : देशात पुन्हा वाढताय करोना रुग्ण, महाराष्ट्रासह 'या' पाच राज्यांना केंद्राचा अलर्ट... आज किती रुग्णांची नोंद?
Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला 'प्रार्थना'चा मोहक लूक, पहा फोटो

काय आहेत केंद्राच्या सूचना?

कोविड स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पंचसूत्री राबवा. टेस्टिंग, ट्रॅकिंग तसेच लसीकरणावर भर द्या. कोविड अनुरूप वर्तन पाळलं जाईल यासाठी पावले उचला. गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक असून त्याबाबत कोणतीही ढिलाई नको, अशाप्रकारच्या सूचनाही या पत्रात करण्यात आल्या आहेत.

COVID19 : देशात पुन्हा वाढताय करोना रुग्ण, महाराष्ट्रासह 'या' पाच राज्यांना केंद्राचा अलर्ट... आज किती रुग्णांची नोंद?
आलिया-रणबीरच्या विवाहसोहळ्याचे फोटो पाहिलेत का?

Related Stories

No stories found.