COVID19 : महाराष्ट्रात करोनाचा विस्फोट; देशातील स्थिती काय?

COVID19 : महाराष्ट्रात करोनाचा विस्फोट; देशातील स्थिती काय?

दिल्ली | Delhi

दोन वर्षांपासून देशावर करोनाचे (covid19) संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाचे (corona update india) रुग्ण झपाट्याने कमी होत असल्यामुळे करोनाचे संकट टळले असे वटत होते. मात्र पुन्हा एकदा देशात करोनाचा धोका वाढत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. करोनाबरोबर ओमिक्रॉनच्या रुगणसंख्येत (Omicron variant) देखील वाढ होत आहे.

तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं सध्या दिसून येत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात करोनाची तिसऱ्या लाट आली असल्याचं बोललं जात आहे. कारण काल (२ डिसेंबर) दिवसभरात महाराष्ट्रात तब्बल ११ हजार ८७७ नव्या करोना रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच ९ कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे.

महाराष्ट्राचा मृत्यूदर २.११ टक्के एवढा झाला आहे. तसेच काल दिवसभरात २ हजार ६९ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात एकूण ६५ लाख १२ हजार ६१० रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९७.२१ टक्के झाले आहेत.

देशातील करोना स्थिती काय?

देशात गेल्या २४ तासांत ३३ हजार ७५० करोना रुग्ण आढळले असून १२३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासांत १० हजार ८४६ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४५ हजार ५८२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात एकूण बरे झालेल्यांची संख्या ३ कोटी ४२ लाख ९५ हजार ४०७वर पोहोचली आहे. तर, मृतांच्या संख्येनं ४ लाख ८१ हजार ८९३चा आकडला पार केलाय.

ओमिक्रॉनचे १७०० रुग्ण

देशातील ओमिक्रोन बाधितांची संख्या १७०० वर पोहोचली आहे. देशातील सर्वाधिक ओमिक्रॉन बाधितांची संख्या महाराष्ट्रात नोंदविण्यात आली असून येथे ५१० ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राजधानी दिल्लीची नोंद करण्यात आली आहे. येथे ३५१ ओमिक्रॉन बाधितांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. देशाच्या इतर भागातदेखील ओमिक्रॉनची लागण होण्याचे प्रमाण वाढतांना दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com