करोनाचा कहर : ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या क्रमांकावर

गेल्या २४ तासात १०१६ रुग्णाचा मृत्यू
करोनाचा कहर : ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या क्रमांकावर

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगात भारत आता करोना बाधितांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

सलग दुसऱ्या दिवशीही तब्बल ९० हजाराच्या वर रूग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात १०१६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ९० हजार ८०२ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ४२ लाख ०४ हजार ६१४ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ३२ लाख ५० हजार ४२९ रूग्ण करोनामुक्त झाले असून ८ लाख ८२ हजार ५४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत ७१ हजार ६४२ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

जगात करोना बाधितांची संख्या अमेरिकेत सर्वाधिका 64 लाख 60 हजार 421 आहे. भारत ब्राझीलला मागे टाकत 42 लाख 04 हजार 613 वर पोहचला आहे. ब्राझीलमध्ये 41 लाख 37 हजार 606 करोना रुग्ण आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com