Corona Update : भारतात ३५ हजारांहून कमी रुग्णांची नोंद; महाराष्ट्रात Delta Plus च्या रुग्णसंख्येत वाढ

Corona Update : भारतात ३५ हजारांहून कमी  रुग्णांची नोंद; महाराष्ट्रात Delta Plus च्या रुग्णसंख्येत वाढ

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, देशात आता करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रीय रुग्णांचा आलेख आता उतरताना दिसत आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ३२ हजार ९३७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ४१७ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २२ लाख २५ हजार ५१३ इतकी झाली असून आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी १४ लाख ११ हजार ३२४ वर पोहोचली आहे. देशात सध्या ३ लाख ८१ हजार ९४७ रुग्णांवर (Corona active patient) उपचार सुरु आहेत. दरम्यान देशात आतापर्यंत ४ लाख ३१ हजार ६४२ जणांचा मृत्यू (Corona Death) झाला आहे.

दरम्यान देशात काल दिवसभरात १७ लाख ४३ हजार ११४ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. पैकी १२ लाख ७२ हजार ८२९ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ४ लाख ७० हजार २८५ इतकी आहे. त्यामुळे आता लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या ५४ कोटी ५८ लाख ५७ हजार १०८ वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात काल (रविवारी) ४ हजार ७९७ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३ हजार ७१० रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६१ लाख ८९ हजार ९३३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८३ टक्के आहे. राज्यात काल (रविवारी) १३० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.११ टक्के झाला आहे.

राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ६६ रुग्ण आढळले असून त्यातील ६१ रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. या रुग्णांपैकी ३१ रुग्ण हे लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असणारे असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्याचीदेखील आवश्यकता भासलेली नाही. दरम्यान, या ६६ रुग्णांपैकी १० जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. ८ जणांनी केवळ एक डोस घेतलेला आहे. लसीकरण झालेल्यांपैकी २ व्यक्तींनी कोवॅक्सिन; तर इतर सर्वांनी कोविशिल्ड लस घेतलेली आहे.

चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील डेल्टा प्लसच्या एकूण रुग्णांपैकी सात रुग्ण म्हणजेच १० टक्के रुग्ण हे लहान मुल आहेत; तर सर्वाधिक ३३ रुग्ण १९ ते ४५ वयोगटातील आहेत. त्या खालोखाल ४६ ते ६० वर्षे वयोगटातील १८ रुग्ण आहेत. ६० वर्षांवरील ८ रुग्ण आहेत. या ६६ डेल्टा प्लस रुग्णांपैकी ३४ स्त्रिया; तर ३२ पुरुष आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com