COVID19 : भारतातील दैनंदिन रुग्ण संख्या ४० हजारांच्या आत, मृतांचा आकडाही घटला

महाराष्ट्रातील स्थिती काय?
COVID19 : भारतातील दैनंदिन रुग्ण संख्या ४० हजारांच्या आत, मृतांचा आकडाही घटला

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने करोनाची दुसरी लाट आता बर्‍यापैकी नियंत्रणात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३९ हजार ७९६ नवे करोना रुग्ण (New Covid19 Patient) आढळले असून ७२३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या ३ कोटी ०५ लाख ८५ हजार २२९ इतकी झाली आहे.

तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू (Covid19 death) झालेल्यांची संख्या ४ लाख ०२ हजार ७२८ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ४२ हजार ३५२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ९७ लाख ०० हजार ४३० वर पोहचली आहे. तसेच देशात सध्या ४ लाख ८२ हजार ०७१ रुग्णांवर उपचार आहेत.

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण ३५ कोटी २८ लाख ९२ हजार ०४६ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील १४ लाख ८१ हजार ५८३ लसीचे डोस रविवारी एकाच दिवसात देण्यात आलेत. (corona vaccination update)

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona update)

राज्यात रविवारी ९ हजार ३३६ करोना बाधीत रुग्णांची वाढ झाली, तर नवीन ३ हजार ३७८ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५८ लाख ४८ हजार ६९३ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १ लाख २३ हजार २२५ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.९१ टक्के झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com