COVID19 : दिलासादायक! भारतातील सक्रिय रुग्णसंख्या पाच लाखांच्या खाली

COVID19 : दिलासादायक! भारतातील सक्रिय रुग्णसंख्या पाच लाखांच्या खाली

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने करोनाची दुसरी लाट आता बर्‍यापैकी नियंत्रणात आली आहे.

COVID19 : दिलासादायक! भारतातील सक्रिय रुग्णसंख्या पाच लाखांच्या खाली
उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत यांचा राजीनामा; कोण होणार नवे मुख्यमंत्री?

दिलासादायक बाब म्हणजे, २७ जूनपासून सलग ५० हजारांहून कमी नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. तसेच तसेच करोनाबाधित रुग्णांपेक्षा करोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सातत्याने उपचाराधीन रुग्णसंख्या (Active Patient) घटत आहे. मात्र नव्याने आढळलेल्या डेल्टा प्लस (Delta Plus Variant) करोनाच्या नवीन प्रकारामुळे चिंतेचे वातावरण आहे. डेल्टा प्लसमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४४ हजार १११ नवे करोना रुग्ण आढळले असून ७३८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या ३ कोटी ०५ लाख ०२ हजार ३६२ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख ०१ हजार ०५० वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ५७ हजार ४७७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ९६ लाख ०५ हजार ७७९ वर पोहचली आहे.

दरम्यान महाराष्ट्रासारख्या (Maharashtra) मोठ्या राज्यांतील परिस्थिती आटोक्यात असली तरी, केरळ, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, ओडिशा आणि मणिपूर या सहा छोट्या राज्यांमध्ये रुग्ण वाढू लागले आहेत. करोना साथीची दुसरी लाट सरली नसल्याने राज्यांना दक्षता घ्यावी लागेल, अशी सूचना करोना कृतिगटाचे प्रमुख आणि निती आयोगाचे (आरोग्य) सदस्य व्ही. के. पॉल (Task Force chief and Niti Aayog Member Dr VK Paul) यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com