Corona Update : भारतात गेल्या २४ तासांत ३६ हजार रुग्ण, एकट्या केरळात ७० टक्के

Corona Update : भारतात गेल्या २४ तासांत ३६ हजार रुग्ण, एकट्या केरळात ७० टक्के
Corona

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, देशात आता करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र केरळ असं राज्य आहे, जिथे करोनानं पुन्हा डोकं वर काढलं असून एकूण आकडेवारीपैकी ७० टक्के करोना रुग्णांची नोंद फक्त केरळात होत आहे.

देशात गेल्या २४ तासांत ३६ हजार ४०१ नव्या रुग्णांची नोंद

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ३६ हजार ४०१ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ५३० जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २३ लाख २२ हजार २५८ इतकी झाली असून आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी १५ लाख २५ हजार ८० वर पोहोचली आहे.

रिकव्हरी रेट ९७.५३ टक्के

देशात सध्या ३ लाख ६४ हजार १२९ सक्रिय रुग्ण उपचाराधिन आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या गेल्या १४९ दिवसांतील सर्वात कमी आहे. तर, आतापर्यंत ४ लाख ३३ हजार ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट ९७.५३ टक्के आहे. तर विकली पॉझिटीव्हीटी रेट १.९५ टक्के असून गेल्या ५५ दिवसांपासून हा रेट ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच दररोजचा पॉझिटीव्हीटी रेट १.९४ टक्के असून तो गेल्या २४ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

एकट्या केरळात ७० टक्के रुग्ण

केरळात करोनाच्या २१ हजार ४२७ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. म्हणजेच, ७० टक्के रुग्ण केवळ केरळातीलच आहेत. अशातच करोनामुळे १७९ रुग्णांचा मृत्यू झाला. केरळात नव्या कोरोनाबाधितांसोबतच एकूण बाधितांची संख्या वाढून ३७ लाख २५ हजार झाली आहे. तर मृतांचा आकडा १९ हजार ०४९ वर पोहोचला आहे. तर एका दिवसात १८ हजार ७३१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

लसीकरण मोहिम

देशात सुरु असंलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत ५६ कोटी ६४ लाख ८८ हजार ४३३ जणांचं लसीकरण पूर्ण झालंय. गेल्या २४ तासांत देशभरात ५६ लाख ३६ हजार ३३६ जणांना करोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात दैनंदिन करोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. काल ५ हजर १३२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ हजार १९६ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ०९ हजार ३६४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९३ टक्के आहे. तसेच राज्यात काल १५८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com