टेन्शन काही संपेना! देशातील दैनंदिन करोनाबाधितांची संख्या पुन्हा ३५ हजारांच्या वर

टेन्शन काही संपेना! देशातील दैनंदिन करोनाबाधितांची संख्या पुन्हा ३५ हजारांच्या वर

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा कहर पाहायला मिळत असून दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. काल ३४ हजार ४०३ रुग्ण आढळल्यानंतर आज रुग्णसंख्या ३५ हजारांवर गेली आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत देशामध्ये ३५ हजार ६६२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन करोना रुग्णांची संख्या ३ लाख ४० हजार ६३९ झाली आहे. तर देशातील एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी ३४ लाख १७ हजार ३९० इतकी झाली आहे. तसेच गेल्या २४ तासात ३३ हजार ७९८ जणांनी करोनावर मात केली असून २८१ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी २६ लाख ३२ हजार २२२ जणांनी करोनावर मात केली असून ४ लाख ४४ हजार ५२९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिलासादायक म्हणजे करोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असून, देशाचा रिकव्हरी रेट ९७.६५ टक्क्यांवर आहे. देशाचा आठवड्याचा पॉझिटीव्हीटी रेट २.२ टक्क्यांवर असून हा दर गेल्या ८५ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर डेली पॉझिटिव्हीटी रेट २.४६ टक्क्यांवर असून हा दर १९ दिवसांपासून तीन टक्क्यांच्या खाली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात काल ३ हजार ५८६ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ४१० रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख २४ हजार ७२० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के आहे. राज्यात काल ६७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com