दिलासादायक! करोना रुग्णवाढीची गती मंदावली, मृत्यूंच्या संख्येतही होतेय घट

दिलासादायक! करोना रुग्णवाढीची गती मंदावली, मृत्यूंच्या संख्येतही होतेय घट

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असताना गेल्या काही दिवसांपासून करोना रूग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे. देशातून करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याची चिन्हे आकडेवारीतून दिसत आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत १ लाख ६५ हजार ५५३ नवे करोना रुग्ण आढळले असून ३ हजार ४६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ७८ लाख ९४ हजार ८०० इतकी झाली आहे.

तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ लाख २५ हजार ९७२ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात २ लाख ७६ हजार ३०९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ५४ लाख ५४ हजार ३२० वर पोहचली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात रोज कमी होणाऱ्या रुग्णसंख्या पाहता करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यात आज २० हजार २९५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३१ हजार ९६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता रिकव्हरी रेट ९३.४६ टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज ४४३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरी भागात करोना बऱ्यापैकी आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही करोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहेत.

Related Stories

No stories found.