Corona Update : देशात करोनाची काय आहे स्थिती?

Corona Update : देशात करोनाची काय आहे स्थिती?

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, देशात आता करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. करोनाचा प्रादुर्भाव होतांना दिसत असला तरी दैनंदिन रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ३४ हजार ४५७ करोनाबाधित आढळले असून ३७५ जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ६१ हजार ३४० वर पोहोचली आहे. ही रुग्णसंख्या गेल्या १५१ दिवसांतील सर्वात कमी आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात दैनंदिन करोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. काल (शुक्रवारी) ४ हजार ३६५ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ हजार ३८४ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख २१ हजार ३०५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९७ टक्के आहे. राज्यात काल १०५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

भारताच्या आणखी एका स्वदेशी लसीला मंजुरी

भारतात झायडस कॅडीला या ZyCoV-D लसीला डीसीजीआय (DCGI)ने आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. भारतात तयार झालेली मान्यता मिळालेली ही तिसरी लस आहे. तसंच कोरोनावर जगातील पहिलीच डीएनएवर आधारीत अशी ही लस आहे. १२ वर्षे वयावरील सर्वांना ही लस दिली जाईल. आतापर्यंत भारतात ६ करोना प्रतिबंधक लसींना परवानगी मिळाली आहे. झायडस कॅडीला करोनाविरोधातील जगातील पहिलीच अशी लस आहे जी प्लास्मिड डीएनए लस आहे. झायडस कॅढीला लस बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटसोबत मिळून तयार करण्यात आली आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिननंतर भारतात तयार होणारी ही दुसरी लस आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com