Corona Update : भारतातील सक्रिय रुग्णसंख्या चार लाखांच्या खाली; आज किती रुग्णांची नोंद?

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona update)
Corona Update : भारतातील सक्रिय रुग्णसंख्या चार लाखांच्या खाली; आज किती रुग्णांची नोंद?

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या आकडेवारीत चढ-उतार दिसत आहे. यामुळे करोनाचे संकट अद्याप देशभर कायम आहे.

काल दिवसभरात देशात करोनाच्या ३८ हजार ३५३ नव्या रुग्णांची भर पडली असून ४९७ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात सध्या ३ लाख ८६ हजार ३५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या १४० दिवसांतील ही सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) ९७.४५ टक्क्यांवर आहे.

दरम्यान देशात गेल्या २४ तासांत ४० हजार १३ रुग्ण करोनातून बरे झाले असून करोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी १२ लाख २० हजार ९८१ झाली आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) ९७.४५ टक्क्यांवर आहे. तर आठवड्याचा पॉझिटीव्हीटी रेट २.३४ टक्के असून दिवसाचा पॉझिटीव्हीटी रेट २.१६ टक्के आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona update)

राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दुसरीकडे रोज मोठ्यासंख्येने रूग्ण करोनातून बरे देखील होत असल्याने काहीसे दिलादासायक चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात काल दिवसभारत ७ हजार ७२० रूग्ण करोनातून बरे झाले असून, ५ हजार ६०९ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय १३७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाख ५९ हजार ६७६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.८ टक्के एवढे झाले आहे. तर राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३ लाख ६३ हजार ४४२ झाली असून राज्यात आजपर्यंत १३ लाख ४२ हजार ०१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com