मोठा दिलासा! भारतात १४७ दिवसांनंतर निच्चांकी रुग्णांची नोंद

४१ हजारांहून अधिक करोनामुक्त
मोठा दिलासा! भारतात १४७ दिवसांनंतर निच्चांकी रुग्णांची नोंद

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या आकडेवारीत चढ-उतार दिसत आहे. यामुळे करोनाचे संकट अद्याप देशभर कायम आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आज १४७ दिवसानंतर सर्वाधिक कमी करोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत भारतात २८ हजार २०४ नवीन करोना रुग्ण आढळले असून ३७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ४१ हजार ५११ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.

देशातीळ एकूण ३ कोटी १९ लाख ९८ हजार लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत ४ लाख २७ हजार ८६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३ कोटी ११ लाख ८० हजार रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या देशात एकूण ३ लाख ८८ हजार ५०८ करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com