Corona Update : भारतातील रिकव्हरी रेट ९७.४० टक्क्यांवर, करोनाबळींचा आकडाही घटला

Corona Update : भारतातील रिकव्हरी रेट ९७.४० टक्क्यांवर, करोनाबळींचा आकडाही घटला

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या आकडेवारीत चढ-उतार दिसत आहे. यामुळे करोनाचे संकट अद्याप देशभर कायम आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी देशात ३५ हजार ४९९ नवीन रुग्ण आढळले असून ४४७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर ३९ हजार ६८६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

देशात करोनाची रुग्णसंख्या ९ टक्क्यांनी कमी झाली आहे. देशात आतपर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख २८ हजार ३०९ झाली आहे. तर, बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी ११ लाख ३९ हजार ४५७ झाली आहे.

देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९७.४० टक्क्यांवर आहे. तर, आठवड्याचा पॉझिटीव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी असून तो २.३५ टक्के आहे. तर, दररोजचा पॉझिटीव्हीटी रेट २.५९ टक्के आहे. हा दर गेल्या १४ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

दरम्यान देशात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली होती. आतापर्यंत देशातील ५०.६८ कोटी लोकांना करोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com