Corona Update : भारतात सलग दुसऱ्या दिवशी ४० हजारांहून अधिक रुग्ण, ५०७ रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona update)
Corona Update : भारतात सलग दुसऱ्या दिवशी ४० हजारांहून अधिक रुग्ण, ५०७ रुग्णांचा मृत्यू

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने करोनाची दुसरी लाट आता बर्‍यापैकी नियंत्रणात आली आहे. मात्र सलग दुसऱ्या दिवशी ४० हजारांहून अधिक नवे करोनाबाधितांचा आढळल्याने देशाची चिंता वाढली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४१ हजार ३८३ नवे करोना रुग्ण आढळले असून ५०७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख १८ हजार ९८७ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ३८ हजार ६५२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या ०३ कोटी ०४ लाख २९ हजार ३३९ वर पोहचली आहे. तसेच देशात सध्या ४ लाख ०९ हजार ३९४ रुग्णांवर उपचार आहेत.

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona update)

राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. शिवाय, दररोज मोठ्यासंख्येने रूग्ण करोनातून बरे देखील होत आहेत. मात्र असे जरी असले तरी देखील अद्यापही करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत रोज भर पडतच आहे. राज्यात काल ८ हजार १५९ नवीन करोनाबाधित आढळले असून, ७ हजार ८३९ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय १६५ करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे. राज्यात एकूण ६० लाख ०८ हजार ७५० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत १ लाख ३० हजार ९१८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com