COVID19 : भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत घट कायम, पण...

महाराष्ट्रातील स्थिती काय?
COVID19 : भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत घट कायम, पण...
Corona

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने करोनाची दुसरी लाट आता बर्‍यापैकी नियंत्रणात आली आहे. मात्र, एकीकडे दैनंदिन करोनाबाधितांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे मृतांचा आकडा मात्र कमी होण्याचं नाव घेत नाहीये. (Coronavirus update india)

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४३ हजार ०७१ नवे करोना रुग्ण आढळले असून ९५५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या ३ कोटी ०५ लाख ४५ हजार ४३३ इतकी झाली आहे.

तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख ०२ हजार ००५ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ५२ हजार २९९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ९६ लाख ५८ हजार ०७८ वर पोहचली आहे. तसेच देशात सध्या ४ लाख ८५ हजार ३५० रुग्णांवर उपचार आहेत.

दरम्यान भारतामधील १० राज्यात कडल लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, छत्तीसगढ़, ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडू, मिजोरम, गोवा आणि पुडुचेरी या राज्यात कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

महाराष्ट्रात दैनंदिन करोनाबाधितांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात काल ८ हजार ३९५ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला, तर ९ हजार ४८९ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या १ लाख १७ हजारांच्या वर आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के एवढे झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com