COVID19 : दिलासादायक! देशात गेल्या ९१ दिवसांमधील निच्चांकी रूग्णवाढ

८१ हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त
COVID19 : दिलासादायक! देशात गेल्या ९१ दिवसांमधील निच्चांकी रूग्णवाढ

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने करोनाची दुसरी लाट आता बर्‍यापैकी नियंत्रणात आली आहे. महिनाभरापासून करोनाबाधित रुग्णांपेक्षा करोनामुक्त रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४२ हजार ६४० नवे करोना रुग्ण आढळले असून १ हजार १६७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ९९ लाख ७७ हजार ८६१ इतकी झाली आहे.

तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ लाख ८९ हजार ३०२ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ८१ हजार ८३९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ८९ लाख २६ हजार ०३८ वर पोहचली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

महाराष्ट्रातही करोना रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. महाराष्ट्रात काल ०६ हजार २७० नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १३ हजार ७५८ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यात १ लाख २४ हजार ३९८ सक्रिय रुग्ण आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com