दिलासा! भारतातील दैनंदिन करोना बाधितांची संख्या २५ हजारांवर

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona cases)
दिलासा! भारतातील दैनंदिन करोना बाधितांची संख्या २५ हजारांवर

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, देशात आता करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. भारतात गेल्या २४ तासात कालच्या तुलनेत करोना बाधितांच्या संख्येत जवळपास ५ हजारांनी घट झाली. तसेच करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत २५ हजार ०७२ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ३८९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासात ४४ हजार १५७ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. भारतातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २४ लाख ४९ हजार ३०६ इतकी झाली असून आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी १६ लाख ८० हजार ६२६ वर पोहोचली आहे. देशात सध्या ३ लाख ३३ हजार ९२४ सक्रिय रुग्ण उपचाराधिन असून आतापर्यंत ४ लाख ३४ हजार ७५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट

देशात रुग्णसंख्या कमी होत असली तरी दुसऱ्या बाजूला केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एका पॅनेलने पंतप्रधान कार्यालयाला तिसऱ्या लाटेबद्दल (Corona third wave) सावध केलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या (National Institute of Disaster Management) अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समितीने ऑक्टोबरमध्ये करोना संसर्ग उच्चांकी पातळी गाठेल असा इशारा दिला आहे. तसंच याचा लहान मुलांवर परिणाम होईल असंही म्हटलं असून येणाऱ्या संकटाला सामोरं जाण्यासाठी तयार राहण्यास सांगितलं आहे. रुग्णालयांनी यंत्रणा सज्ज ठेवावी असा सल्लाही समितीने दिला आहे. तसेच निती आयोगानेसुद्धा (NITI Ayog) केंद्र सरकारला (Central Govt) तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. कोरोनाचं संकट टळलेलं नसून तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेच्या तुलनेत धोकादायक असू शकते असं निती आयोगाने म्हटलं आहे. तसंच या लाटेचा सामना करण्यासाठी दोन लाख आयसीयू बेड (ICU Bed) तयार ठेवले पाहिजेत असंही निती आयोगाने म्हटलं.

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona cases)

राज्यात रविवारी ४ हजार १४४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली तर, ४ हजार ७८० बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट वाढून ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ६४ लाख २४ हजार ६५१ एवढी झाली आहे. त्यापैकी ६२ लाख ३१ हजार ९९९ जण करोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या ५३ हजार १८२ सक्रिय करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच राज्यात काल १४५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत १ लाख ३५ हजार ९६२ रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com