करोनाचा धोका अद्याप टळलेला नाही! भारतात गेल्या २४ तासात ३१ हजार नवे रुग्ण

महाराष्ट्रातील स्थिती काय?
करोनाचा धोका अद्याप टळलेला नाही! भारतात गेल्या २४ तासात ३१ हजार नवे रुग्ण
Corona

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, देशात आता करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. त्यामुळे करोनाचा धोका अद्याप टळलेला नाही.

Corona
Afghanistan Crisis : १६८ जणांना घेऊन IAF चं विमान भारतात दाखल

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ३० हजार ९४८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ४०३ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २४ लाख २४ हजार २३४ इतकी झाली असून आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी १६ लाख ३६ हजार ४६९ वर पोहोचली आहे. देशात सध्या ३ लाख ५३ हजार ३९८ सक्रिय रुग्ण उपचाराधिन असून आतापर्यंत ४ लाख ३४ हजार ३६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लसीकरण मोहिम

देशात सुरु असंलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत ५८ कोटी १४ लाख ८९ हजार ३७७ लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. गेल्या २४ तासांत ५२ लाख २३ हजार ६१२ लोकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात दैनंदिन करोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. काल ४ हजार ५७५ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ हजार ९१४ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख २७ हजार २१९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९९ टक्के आहे. तसेच राज्यात काल १४५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com