Corona update : देशात ४० हजारांहून अधिक करोनाबाधितांची नोंद, केरळात विस्फोट
Corona

Corona update : देशात ४० हजारांहून अधिक करोनाबाधितांची नोंद, केरळात विस्फोट

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona update)

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या आकडेवारीत चढ-उतार दिसत आहे. यामुळे करोनाचे संकट अद्याप देशभर कायम आहे. देशातील करोनाबाधितांच्या संख्येत गेल्या २४ तासात पुन्हा काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात करोनाच्या ४२ हजार ६२५ नव्या रुग्णांची भर पडली असून ५६२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्या आता ४ लाख २५ हजार ७५७ एवढी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात ३६ हजार ६६८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी ०९ लाख ३३ हजार ०२२ झाली आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी १७ लाख ६९ हजार १३२ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर देशात सध्या ४ लाख १० हजार ३५३ उपचाराधीन रुग्ण आहेत.

केरळ राज्यात करोनाचा विस्फोट झाला आहे. एकट्या केरळमध्ये २० हजारांपेक्षा अधिक करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी केरळ राज्यात २३ हजार ६७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दिवसभरात करोनामुळे १४८ लोकांचा मृत्यू झाला आहे. केरळातील एकूण मृतांची संख्या १७ हजार १०३ झाली आहे.

दरम्यान भारतात ऑगस्ट (August) महिन्यात करोनाची तिसरी लाट (Coronavirus Third Wave) येईल आणि ऑक्टोबर (October) महिन्यात ती उच्चांक गाठेल असे एका रिपोर्टमधून समोर आले आहे. या लाटेत दिवसाला १ लाख रुग्ण आढळून येतील किंवा दीड लाखांहून अधिक नागरिक संक्रमित होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. हैदराबाद आणि कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मध्ये मथुकुमल्ली विद्यासागर आणि मनींद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनातून समोर आलेल्या अहवालात असे म्हटले आहे. यात केरळ आणि महाराष्ट्राला सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona update)

महाराष्ट्रात काल दिवसभरात ६ हजार ००५ नवीन करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ हजार ७९९ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६१ लाख १० हजार १२४ रुग्णांनी करोनावर मात केल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ टक्के झाले आहे. काल दिवसभरात महाराष्ट्रात करोनामुळे १७७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com