न्यूझीलंडमध्ये तब्बल १०२ दिवसानंतर आढळले करोना बाधित

पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी दिली माहिती.
न्यूझीलंडमध्ये तब्बल १०२ दिवसानंतर आढळले करोना बाधित

दिल्ली | Delhi

न्यूझीलंडमध्ये करोनावर चांगल्या प्रकारे नियंत्रण आले होते. पण तब्बल १०२ दिवसानंतर न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये चार करोना बाधित आढळून आले असल्याची माहिती पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी दिली आहे.

तसेच ज्या ठिकाणी म्हणजेच ऑकलंडमध्ये हे बाधित आढळले आहे तिथे स्तर तीनच लॉकडाउन घोषित केला असून उर्वरित देशात स्तर दोनचा लॉकडाउन घोषित केला असल्याची माहिती पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com