उत्तर कोरियात करोनाचा शिरकाव
देश-विदेश

उत्तर कोरियात करोनाचा शिरकाव

हुकूमशाह किम जोंग ऊन यांनी केली घोषणा

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

सेऊल | Seoul - आमच्या देशात करोनाचा एकही रुग्ण नसल्याचा दावा करणार्‍या उत्तर कोरियात करोनाचा पहिला रुग्ण सापडल्याची घोषणा हुकूमशाह किम जोंग ऊन यांनी केली आहे. supreme leader dictator North Korea Kim Jong un

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहान शहरातून करोना विषाणूची सुरुवात झाली. हळूहळू या जीवघेण्या विषाणूने संपूर्ण जगभरात आपले हातपाय पसरवले. जगभरात आतापर्यंत 1 कोटी 62 लाखांहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली असून जवळपास 6 लाख 48 हजार 600 लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

अशातच उत्तर कोरियामध्ये करोनाचा एकही रुग्ण नसल्याचा दावा हुकूमशाह किम जोंग उन करत होते. मात्र, आता 8 महिन्यांनी करोना विषाणूने उत्तर कोरियात प्रवेश केला असूनकरोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. उत्तर कोरियात करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली. त्यानंतर किम जोंग उन यांनी सीमेवरील केसोंगमध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे.

एका कोरियन वृत्तवाहिनीनुसार, उत्तर कोरियात आढळून आलेला पहिला करोनाबाधित रुग्ण 3 वर्षांपूर्वी दक्षिण कोरियाला गेला होता. आता तो बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून उत्तर कोरियात परतला आहे. या व्यक्तीला अधिकृतपणे करोना रुग्ण घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे हा उत्तर कोरियातील पहिला करोना रुग्ण ठरला आहे. श्वसन आणि रक्त तपासणीतून या व्यक्तीमध्ये करोना संसर्गची लक्षणे दिसून आली आहेत. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com