
कर्नाल | Karnal
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. भारत जोडो यात्रा नियोजनानुसार ३० जानेवारीला श्रीनगरमध्ये पोहोचणार आहे.
आज (रविवार) सकाळी दाट धुक्यात राहुल गांधींची (Rahul Gandhi) पदयात्रा हरियाणाच्या कर्नालमध्ये पोहोचली. जशी पदयात्रा पुढं सरकत होती, तसतसे उत्साह बघायला मिळत आहे. कर्नालमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Congress Workers) जोरदार डान्स केलाय. ४.५ अंश सेल्सिअस तापमानात राहुल गांधींचे समर्थक शर्ट काढून नाचताना दिसले. यावेळी समर्थकांनी बसवर उभं राहून हरियाणवी गाण्यांवर जबरदस्त डान्स केला.
सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी आहे. मात्र, असे असले तरी भारत जोडो यात्रा करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी सतत्याने एका टी-शर्टवरच दिसत आहेत. त्यांना अनेक वेळा विचारण्यात आले की, आपण असे का करत आहात? आणखी काही कपडे का परिधान करत नाहीत? राहुल गांधींना थंडी वाजत नाही? आणि नसेल तर त्यामागचे कारण काय? यावर राहुल गांधींनी उत्तर दिले आहे.
राहुल गांधी म्हणाले, आपण थंडीला घाबरत नाही, म्हणून आपल्याला थंडी वाजत नाही. जे लोक स्वेटर अथवा जॅकेट घालत आहेत, ते थंडीला घाबरतात. यामुळेच त्यांना थंडी वाजते. मात्र, माज्या बाबतीत असे नाही. माझी यात्राच मुळात भीती विरोधात आहे. मला भीती वाटत नाही.