काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना करोनाची लागण

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना करोनाची लागण

दिल्ली Delhi

काँग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना करोनाची (COVID19) लागण झाल्याचं समोर आलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी ही माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांच्या काँग्रेस नेत्यासोबत (Congress leader) बैठका सुरु होत्या. दरम्यान, या भेटीगाठी व बैठकांमुळे सोनिया गांधी यांना करोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच दरम्यान सोनिया गांधींच्या संपर्कात आलेल्या इतरही नेत्यांना करोनाची लागण झाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, सोनिया गांधींना काल (बुधवारी) संध्याकाळी सौम्य ताप आला होता, त्यानंतर त्यांची करोना चाचणीत पॉझिटिव्ह आली आहे. सोनिया गांधींनी सध्या स्वत:ला वेगळे केले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती ठीक आहे.'

दरम्यान, कालच अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणासंदर्भात (National Herald case) ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर सोनिया आणि राहुल यांना ८ जून रोजी ईडी अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com