दिल्ली । Dehli

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल वोरा याचं निधन झालं आहे. ते ९३ वर्षांचे होते. मोतीलाल वोरा यांनी दोनवेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीपद भुषवलं आहे.

काल (रविवार, 20 डिसेंबर) त्यांना एस्कॉर्ट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. हृदयस्पर्षी गोष्ट अशी की कालच त्यांचा वाढदिवस होता. मोतीलाल वोरा (Motilal Vora ) हे प्रदीर्घ काळापासू काँग्रेस पक्षाचे खजीनदार राहिले.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातील मोतीलाल वोरा करोना पॉझिटिव्ह आढळले होते. परंतु, करोना संक्रमणावर त्यांनी यशस्वीरित्या मात केली होती. दीर्घकाळ काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या मोतीलाल वोरा यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री तसंच उत्तर प्रदेशचे राज्यपालपदाची जबाबदारी हाताळली होती.

मोतीलाल वोरा हे काँग्रेसचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते होते. २०१८ साली वाढत्या वयाचं कारण देत राहुल गांधी यांनी त्यांची कोषाध्यक्षपदाची जबाबदारी अहमद पटेल यांच्या हाती सोपवली होती. अहमद पटेल यांचंही काही दिवसांपूर्वी निधन झालंय. त्यामुळे, काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे.

मोतीला वोरा यांचा जन्म 20 डिसेंबर 1927 या दिवशी जोधपूर येथील निंबी जोधा जोधपूर येथे झाला. ते पुष्करणा ब्राह्मण परिवारातून येत. त्यांचे शिक्षण रायपूर आणि कोलकाता येथे झाले. ते हाडाचे पत्रकार होते. त्यांनी विविध वृत्तपत्रांसाठी काम केले. त्यांचा विवाह शांतीदेवी यांच्याशी झाला. त्यांना चार मुली आणि दोन मुले आहेत. त्यापैकी एक मुलगा अरुण वोरा हे छत्तीसगड येथील दुर्ग येथून विधानसभेवर आमदार आहेत.