महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात

File Photo
File Photo

मुंबई | Mumbai

महागाईविरोधात (Inflation) काँग्रेसने (Congress) देशव्यापी आंदोलन (Agitation) सुरू केले. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह मुंबई, नाशिक आणि अन्य थिअक्नि काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले...

आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ताब्यात घेतले.

File Photo
Video : सांगा आमचं काय चुकलं?; शाळा बंद, चिमुकल्यांची १५ किमीची पायपीट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा निघणार होता. पण दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचा हा मोर्चा रोखला आणि आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

File Photo
Video : ...तर राऊतांना आमच्या शुभेच्छाच; भुजबळांनी सांगितला अनुभव

महाराष्ट्रातही काँग्रेसचे वरिष्ठ नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले दिसले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वात मुंबईत विधिमंडळासमोर आंदोलन करण्यात आले.

File Photo
अथक प्रयत्नाअंती बुडालेल्या युवकाचा मृतदेह हाती; 'पाहा' थक्क करणारा व्हिडीओ...

हा मोर्चा विधिमंडळापासून राजभवनकडे जाणार होता. मात्र, त्याआधीच पोलिसांनी काँग्रेस नेत्यांची धरपकड केली. नाना पटोले (Nana Patole), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com