ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना झटका; गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ

ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना झटका; गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ

नवी दिल्ली | New Delhi

तेल कंपन्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २०४ रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन दर रविवारपासून म्हणजेच १ ऑक्टोबर पासून लागू झाले आहेत. या दरवाढीनंतर मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर आता १,६८४ रुपयांना विकला जाणार आहे.

मात्र, घरगुती गॅसचे भाव जैसे थे राहणार आहेत. ३० ऑगस्टला केंद्रीय कॅबिनेटने या बाबतचा निर्णय घेतला होता. तेव्हा ग्राहकांना गॅसच्या दरात २०० रुपयाने दिलासा दिला आहे. त्यामुळे गॅसचे दर कमी होतील असे ग्राहकांना वाटत होते. पण ग्राहकांच्या या आशांवर पाणी फेरले आहे. १४.२० किलोचा घरगुती गॅस सिलिंडर दिल्लीत ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये, मुंबईत ९०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८.५० रुपयांना उपलब्ध आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना झटका; गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ
इंडिया आघाडीची मुंबईत उद्या पदयात्रा; भाजपच्या विद्वेषी राजकारणाला 'मी पण गांधी'ने उत्तर!

१९ किलोग्रॅमचा गॅस सिलिंडर हा कमर्शिअल गॅस सिलिंडर मानला जातो. हॉटेल आणि इतर व्यावसायिक या गॅस सिलिंडरचा वापर करतात. त्याचा थेट फटका सामान्य जनतेला बसत नसला तरी अप्रत्यक्ष भार हा जनतेवरच येतो. कमर्शिअल गॅस सिलिंडर महागल्यावर हॉटेलमधील पदार्थही महागतात. ज्याचा भुर्दंड ग्राहकांनाच बसतो, आयओसीएलच्या वेबसाईटनुसार हा कमर्शिअल गॅस सिलिंडर २०० रुपयाहून अधिक रुपयाने वाढल्यामुळे ग्राहकांसह सामान्यांना त्याचा फटका बसला आहे.

इतर महानगरांमध्ये किमती किती वाढल्या?

कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत २०३.५० रुपयांनी वाढली आहे. येथे व्यावसायिक गॅस सिलिंडर १,६३६.०० रुपयांऐवजी १,८३९.५० रुपयांना खरेदी करावा लागणार. मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत २०४ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून त्याची किंमत १,४८२ रुपयांवरून १,६८४ रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.

तर चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत २०३ रुपयांनी वाढली असून येथे १,६९५ रुपयांवरून १८९८ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दिल्लीत एलपीजी सिलिंडर १७३१.५० रुपयांना विकला जाणार आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com