विनोदवीर राजू श्रीवास्तव पंचतत्वात विलीन

विनोदवीर राजू श्रीवास्तव पंचतत्वात विलीन

मुंबई | Mumbai

सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांचे काल निधन झाले. तब्बल 42 दिवस मृत्यूशी झुंज देणारे राजू श्रीवास्तव अखेर ही लढाई हरले...

राजू श्रीवास्तव यांच्यावर आज गुरुवारी दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांनी रडलेल्या डोळ्यांनी निरोप घेतला. सुनील पाल, मधुर भांडारकर हे देखील स्मशानभूमीत उपस्थित होते.

दरम्यान, जिममध्ये वर्कआउट करताना हृदय विकाराचा झटका आल्याने प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल 4२ दिवस ते मृत्यूशी लढत होते. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com