गुजरातमध्ये तब्बल 'इतक्या' कोटींच्या ड्रग्जचा साठा जप्त; कच्छ किनारपट्टी भागात केली कारवाई

गुजरातमध्ये तब्बल 'इतक्या' कोटींच्या ड्रग्जचा साठा जप्त; कच्छ किनारपट्टी भागात केली कारवाई

गुजरात | Gujrat

गुजरात पोलिसांना अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई (Cocaine Seized) करण्यात यश आले आहे. गुजरातमध्ये पोलिसांनी ८० कोटींचे ड्रग्स (Drugs Seized) जप्त केले आहे. हे ड्रग्स समुद्र किनाऱ्यावर टाकून दिलेली आढळून आली. एफएसएलच्या प्राथमिक तपासात हे कोकीन असल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत ८०० कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधीधाम शहराजवळ ८० पॅकेटमध्ये कोकीन सापडले. प्रत्येक पॅकेटचे वजन एक किलोग्रॅम आहे. कच्छ-पूर्व विभागाचे पोलीस अधीक्षक सागर बागमार यांनी सांगितले की, कदाचित पकडले जाण्याच्या भीतीने तस्करांनी येथे ड्रग्स टाकून पळ काढला असावा, कारण पोलीस या ठिकाणी लक्ष ठेवून होते.

गुजरातमध्ये तब्बल 'इतक्या' कोटींच्या ड्रग्जचा साठा जप्त; कच्छ किनारपट्टी भागात केली कारवाई
Panjaka Munde: मराठी असल्याने पंकजा मुंडेंनाही मुंबईत घर नाकारलं; व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...

पोलिसांना अंमली पदार्थ तस्करी संदर्भात सुत्रांकडून माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला आणि ड्रग्स तस्करांचा प्लॅन उधळून लावला. पोलिसांच्या भीतीने तस्करांना ८० किलोंचे ड्रग्स समुद्री किनारी लावरीसपणे टाकून पळ काढल्याचा अंदाज आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

बागमार यांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी गांधीधामजवळ जप्त करण्यात आलेल्या पॅकेटचा पूर्वी सापडलेल्या पॅकेटशी कोणताही संबंध नाही. असे दिसते की हे अलीकडेच पॅक केले गेले आहेत. ही पाकिटे त्याच मालाचा भाग आहेत ज्याचा आम्ही माहितीनंतर मागोवा घेत होतो.

गुजरातमध्ये तब्बल 'इतक्या' कोटींच्या ड्रग्जचा साठा जप्त; कच्छ किनारपट्टी भागात केली कारवाई
Asian Games : आशियाई स्पर्धेत मुलींनी मारली बाजी! एअर पिस्टल शूटिंगमध्ये मिळवलं गोल्ड अन् सिल्व्हर मेडल

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि इतर एजन्सींनी गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानजवळील जखाऊजवळच्या किनाऱ्यावरून अनेक वेळा हेरॉईन आणि कोकीनने भरलेले पॅकेट जप्त केली आहेत. येथे तपास केला असता, पकडले जाऊ नये म्हणून तस्करांनी ड्रग्सची पाकिटं समुद्रात फेकून दिली होती, त्यानंतर ती किनाऱ्यावर वाहून गेल्याचे आढळून आले.

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, "गांधीधाम पोलिसांनी ८० किलो कोकेन जप्त केले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे ८०० कोटी रुपये आहे. या यशाबद्दल मी डीजीपी आणि गांधीधाम पोलिसांचे अभिनंदन करतो."

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com