ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींना पाठवले आंबे

दहा वर्षांपासूनची परंपरा कायम
ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींना पाठवले आंबे

कोलकाता / Kolkata - पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. ममता बॅनर्जी पुन्हा एकदा पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाल्यानंतरही केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जींमधील वाद कायम राहिला आहे. मात्र ममता बॅनर्जी यांनी आंबे पाठवण्याची परंपरा कायम राखली आहे

ममता बॅनर्जी यांनी गेल्या आठवड्यात हिमसागर, मालदा आणि लक्ष्मणभोग या जातीचे आंबे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून पाठवले आहेत. मोदींबरोबरच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही भेट म्हणून आंबे पाठवले आहेत. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही आंब्याच्या पेट्या भेट म्हणून पाठवल्या आहेत.

बंगालमधील राजकीय हिंसाचार, नारदा घोटाळ्यातील उघड होत असलेली प्रकरणे, मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांचे अचानक करण्यात आलेले स्थानांतरण आणि राज्यपाल जगदीप घनखड अशा एक ना अनेक विषयांवरून केंद्र सरकार आणि पश्‍चिम बंगाल सरकारमध्ये सातत्याने तणाव आहे. दरम्यान, केंद्र सरकारसोबत तणाव असला तरी ममता बॅनर्जी यांनी आंबे पाठवण्याची परंपरा कायम राखली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com