नवी दिल्ली -

चीनने आपले लष्करी सामर्थ्य वाढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. सिप्रीच्या अहवालानुसार, चीनकडे एकूण 320 अणुबॉम्ब आहेत. पण चीन सैन्यातील

सुत्रांच्या माहितीनुसार देशाकडे एकूण 1 हजार अणुबॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे. यातील 100 अणुबॉम्ब चीनने तात्काळ वापरासाठी सज्ज ठेवले आहेत. युद्धजन्य परिस्थितीतच हे अणुबॉम्ब चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या परवानगीनंतरच रॉकेट फोर्सच्या हवाली देण्यात येतील. रशिया आणि अमेरिकेतील सामंजस्य करारानंतर आता चीनला आपल्याकडील अण्वस्त्रांमध्ये वाढ करण्याची संधीच मिळाली असल्याचं जाणकारोचं म्हणणे आहे.

जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणार्या चीनने अमेरिका आणि रशियाला मागे टाकण्यासाठी आपल्या शस्त्रसाठ्यात पुढील पाच वर्ष आणखी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील एकूण अण्वस्त्रांपैकी 90 टक्के अण्वस्त्र ही केवळ अमेरिका आणि रशियाकडे आहे, अशी माहिती साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिली आहे. 1980 च्या दशकात सोव्हियत रशिया आणि अमेरिकेकडे 10 हजारांहून अधिक अणूबॉम्ब होते. त्यात आता घट होऊन अनुक्रमे 6500 आणि 5000 इतके करण्यात आले आहेत. शांततेच्या करारानुसार यात आणखी घट करुन अणुबॉम्बची संख्या प्रत्येकी 1550 पर्यंत आणण्याचा उद्दीष्ट दोन्ही देशांचं आहे. अमेरिका आणि रशियानं आपल्याकडी अण्वस्त्रांची माहिती जाहीर केली असताना चीनने मात्र याबाबत कोणतीही माहिती जाहीर करणं टाळलं आहे.

दरम्यान, चीनकडे सध्या 100 अणुबॉम्ब वापरण्यायोग्य परिस्थितीत असून हे अमेरिकेतील सर्व शहरांना उद्ध्वस्त करण्यास पुरेसे ठरणारे नाहीत, असं हाँगकाँगचे सैन्य विशेषज्ज्ञ आणि चीनी सैन्याचे माजी अधिकारी सों झोंगपिंग यांनी सांगितलं. दरम्यान, चीनकडे असलेली सीजे-20 क्रूझ मिसाइलमध्ये हवाईमार्गानं अणुबॉम्ब डागता येण्याची क्षमता असल्याचं चीनी सरकारने 2018 साली जाहीर केलं होतं. या मिसाइलची मारक क्षमता तब्बल 2 हजार किलोमीटर इतकी आहे. त्यामुळे शस्त्रांच्याबाबतीत चीन आता अमेरिका आणि रशियाची बरोबरीपर्यंत येऊन पोहोचला आहे.