चीनने सीमेवर सैनिकांची संख्या वाढवली

दगाबाजी करत कराराचा भंग
चीनने सीमेवर सैनिकांची संख्या  वाढवली

लडाख -

लडाखच्या गलवान खोर्‍यातील हिंसक संघर्षानंतर भारत आणि चीनमध्ये वाढलेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी

अधिकार्‍यांमध्ये अनेकदा बैठका झाल्या. यादरम्यान, परस्परांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने सप्टेंबर 2020 मध्ये एक करार केला होता. तो करार दगाबाजी करत चीनकडून तोडण्यात आला आहे.

चीनने पूर्व लडाखमध्ये सैन्याची ठाणी बळकट केली आहेत. तसेच छुप्या पद्धतीने लाइन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोलजवळ सैन्याची संख्या वाढवली आहे. तणाव असलेल्या ठिकाणी सैन्यसंख्या वाढवण्यात येणार नाही, असे दोन्ही देशांनी सहमतीने ठरवले होते. मात्र, आता चीनने दगाबाजी करत कराराचा भंग केला आहे.

चार महिन्यांपूर्वी करण्यात आलेला करार मोडत चीनने पूर्व लडाखमधील सैनिकांची संख्या छुप्या पद्धतीने गुपचूप वाढवली आहे. त्यामुळे या भागातील चीनची सैन्य ठाणी मजबूत झाली आहे. चीनने कराराचा भंग करत पूर्व लडाखमध्ये सैन्यसंख्या वाढवल्याने सीमेवरील तणाव वाढण्याची चिन्हे आहेत. सप्टेंबरमध्ये झालेल्या करारानंतर तणाव वाढेल असे कोणतेही पाऊल उचलणार नसल्याचे दोन्ही देशांनी सहमतीने ठरवले होते. मात्र, सद्यस्थिती बघता चीनने कराराचे उल्लंघन केले आहे.

चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवत भारतीय लष्कर सतर्क आहे. करार झाल्याच्या चार महिन्यांनंतर परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आली आहे. चीनने सैन्यसंख्या वाढवल्याने पुन्हा दोन्ही देशात तणाव वाढण्याची शक्यता आहे. चीनने कराराचा भंग केल्याने आता तो करार निर्थक ठरला आहे.

लडाखमध्ये तापमान उणे 30 अंशांच्या खाली गेले आहे. या हाडे गोठवणार्‍या थंडीतही दोन्ही देशांचे लष्कर आमनेसामने आहे. दोन्ही देशांनी सैन्य मागे घेतलेले नाही. याउलट चीनने एलएसीजवळ सैन्यसंख्या वाढवली आहे. सीमारेषेवर सध्या शांतता असून तणावाचे वातावरण आहे. तणाव निवळण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, चीनची दगाबाजी लक्षात घेता यावर तोडगा निघालेला नाही. तणावाची परिस्थिती लक्षात घेता भारताने आर्टिलरी गन, टँक,लष्करी वाहने सीमेवर तैनात ठेवली आहेत.

दरम्यान, गलवान खोर्‍यातील हिंसक संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशात चर्चेच्या आठ फेर्‍या झाल्या आहेत. मात्र, तणाव कायम आहे. पेगाँग सरोवरावर चीनने दावा केला होता. त्यानंतर तणावाला सुरुवात झाली होती. त्यानंतर दोन्ही सैन्यांच्या जवानांमध्ये संघर्ष झाला होता. त्यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर भारत जवानांनी चीनला सडतोड प्रत्युत्तर देत त्यांच्या काही सैनिकांचा खात्मा केला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव कायम असून चीन करार पाळत नसून अनेक कुरघोडी करत आहेत. चीनच्या प्रत्येक कुरघोडींना भारत जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com