'त्या' युवकांना चीनने भारताकडे सोपवले

या संदर्भात केंद्रीयमंत्री किरेन रिजीजू यांनी ट्वटिद्वारे माहिती दिली
'त्या' युवकांना चीनने भारताकडे सोपवले

दिल्ली | Delhi

काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशचे काँग्रेसचे आमदार निनॉन्ग एरिंग यांनी चीनच्या पीएलएने अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागातून पाच भारतीयांचे कथितरित्या अपहरण केल्याचा दावा केला होता. एरिंग यांनी पीएमओला टॅग करत आपल्या ट्विटमध्ये दावा केला होता की, अरुणाचल प्रदेशच्या सुबनसिरी जिल्ह्यातील पाच जणांचे अपहरण करण्यात आले आहे. त्यांनी भारत सरकारकडे तात्काळ कारवाईची मागणी देखील केली होती.

अखेर चीन सीमेजवळच्या गावातून बेपत्ता झालेल्या पाच युवकांना चीनच्या पीएलएनेभारताकडे सोपवले आहे. लष्करातील सूत्रांनी आज सकाळी ही माहिती दिली. या युवकांना भारताकडे सोपवण्याची प्रक्रिया चीनच्या भागात पार पडली. भारतामध्ये परतण्यासाठी या युवकांना आणखी तासभर लागेल. असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

किबीथू सीमा चौकीवरुन हे युवक अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करतील चीनची पीएलए या युवकांना भारतीय लष्कराडे सोपवेल. या संदर्भात केंद्रीयमंत्री किरेन रिजीजू यांनी ट्वटिद्वारे माहिती दिली होती. एक सप्टेंबरपासून बेपत्ता असलेले हे पाच युवक शिकारी असल्याने लष्कराने म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com