करोना : चीन पुन्हा संकटात

करोना : चीन पुन्हा संकटात

बीजिंग / Beijing - जगाला करोनाच्या संकटात ढकलणार्‍या चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. चीनची राजधानी बीजिंगसह 15 शहरांमध्ये करोनाच्या डेल्टा प्रकाराच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे.

ग्लोबल टाइम्सच्या अहवालात म्हटले आहे, करोनाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ पूर्व चीनच्या जियांगसू प्रांताची राजधानी नानजिंग येथील विमानतळापासून सुरु झाली आणि इतर पाच प्रांतांमधून बीजिंगमध्ये पसरली. अनेक विमानतळ कर्मचार्‍यांनी चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर नानजिंग शहराने सर्व उड्डाणे स्थगित केली आहेत. चीनच्या 15 शहरांमध्ये वेगाने पसरणार्‍या डेल्टा प्रकाराची नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच विविध प्रांतांमध्ये संसर्गाच्या व्यापक प्रसाराबद्दल चिंता वाढली आहे.

चीनसाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे राजधानी बीजिंगमध्ये करोनाच्या नवीन रुग्णांची भर पडली आहे. सुमारे 22 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या शहराच्या स्थानिक प्रशासनाने 1 जुलै रोजी आयोजित केलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या शताब्दी सोहळ्यांसाठी अनेक महिने कोविड -19 पासून शहराचे रक्षण केले होते. आता पुन्हा येथे संसर्गाचा वेग वाढत आहे. बीजिंगमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची निवासस्थाने आहेत. दरम्यान, चीनने अद्याप भारत आणि इतर अनेक देशांमधून हवाई सेवा सुरु केलेली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com