१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण : 'या' तारखेपासून CoWIN वर करता येणार नोंदणी

नोंदणीसाठी लागणार 'हे' पुरावे
cowin
cowin

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा शनिवारी केली. तसेच आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना वर्धक लसमात्रा (बूस्टर डोस) देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले होते.

cowin
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

१५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासंदर्भात मोठी बातमी आली आहे. १ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी CoWIN पोर्टलवर नोंदणी करु शकता. कोवीन प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ आर एस शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.

cowin
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

डॉ. शर्मा म्हणाले, १५ ते १८ वयोगटातील मुलं १ जानेवारीपासून CoWIN पोर्टलवर नोंदणीसाठी पात्र असतील. यासाठी कोविन पोर्टलमध्ये नोंदणीवेळी ओळखपत्रासाठी १० वीचं विद्यार्थी ओळखपत्र सादर करता येणार आहे. कारण काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कुठलं ओळखपत्र नसू शकतं. त्यामुळं त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com