सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांचं कोव्हॅक्सिनबाबत मोठं विधान; म्हणाले...

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांचं कोव्हॅक्सिनबाबत मोठं विधान; म्हणाले...
एन.व्ही. रमणN. V. Ramana

नवी दिल्ली | New Delhi

कोव्हॅक्सिन (covaxin) लसीला मान्यता मिळण्याच्या मार्गात अनेक अडथळे आले. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या लसीला (Vaccine) मान्यता मिळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला...

याबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडे (WHO) तक्रारही करण्यात आली, असे भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही रमण म्हणाले. हैदराबाद (hyderabad) येथे रामेनीनी फाउंडेशन पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

ते म्हणाले की, मला लसींबद्दल एक गोष्ट सांगायची आहे. तज्ञ सांगतात की कोव्हॅक्सिन (covaxin) प्रभावी आहे आणि अगदी नवीन व्हेरिएंटवरदेखील काम करते. मात्र या लसीवर अनेकांनी टीका केली आहे. याचे कारण ही लस भारतात बनवली.

काहींनी जागतिक आरोग्य संघटनेकडे लसीबाबत तक्रारदेखील केली होती. फायझर सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतीय लसीच्या विरोधात काम केले असताना, देशातही अनेकांनी या लसीला जागतिक मान्यता मिळवण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला.

एका तेलुगूने जगातील दुसर्‍या तेलुगू व्यक्तीला प्रोत्साहन दिले पाहिजे. आपल्यामध्ये एकतेची गरज आहे हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या तेलुगू भाषा आणि संस्कृतीच्या महानतेचा प्रचार केला पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, भारत बायोटेक म्हणजे इनोव्हेशन आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण जगात आघाडीवर आहोत. सर्व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांनी आपल्या समाजासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना पुरस्कार देताना मला आनंद होत आहे.

भारत बायोटेकचे कौतुक

भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक. डॉ कृष्णा एम. एला आणि सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एम. एला यांचे औषध विज्ञानाच्या विकासात मोठे दिल्याबद्दल रमण यांनी त्यांचे कौतुक केले. भारत बायोटेकला रामेनेनी फाऊंडेशनकडून २०२१ चा पुरस्कार मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com