
दिल्ली | Delhi
नक्षलग्रस्त भागात (Naxal Area) सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. तेलंगणा आणि छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये (naxals killed in encounter) चकमक झाली. या ६ नक्षलवादी ठार झाले आहेत. तेलंगणा ग्रेहाऊंड्स आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
चकमकीच्या ठिकाणावरून ६ नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे. सकाळी १०.३० वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती आणि पोलिसांचे पथक सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे एसपी सुनील दत्त म्हणाले. अद्याप नक्षलींचा शोध सुरु असल्याची माहितीसुद्धा सुनिल दत्त यांनी दिली.
नक्षलवादी आयईडीद्वारे सुरक्षा दलांना लक्ष्य करत आहेत. कारण बस्तर आणि अबुजमाद भागातील स्थानिकांचा नक्षलवाद्यांचा पाठिंबा कमी होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.