
दिल्ली | Delhi
छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांच्या हातावर लहान चाबकाचे ५ फटके मारण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. छत्तीसगढमधील प्रथा परंपरेनुसार लक्ष्मीपूजनानिमित्त आयोजित सोहळ्यात ही परंपरा जपण्यात आली आहे.
हातावर फटके मारल्यानंतर सुख-शांती येते अशी धारणा येथील परंपरेची आहे. त्यातूनच, मुख्यमंत्र्यांनी या वेदना सहन करत जनतेच्या आयुष्यात आनंद आणि सुख यावे, ही मनोकामना केली.