रेल्वे स्टेशनवर स्फोट, CRPF चे सहा जवान गंभीर जखमी

रेल्वे स्टेशनवर स्फोट, CRPF चे सहा जवान गंभीर जखमी

दिल्ली l Delhi

रेल्वे स्थानावर उभ्या असलेल्या एका ट्रेनमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या स्फोटात CRPF चे सहा जवान जखमी झाले आहेत.

छत्तीसगडची (Chhattisgarh) राजधानी रायपूर रेल्वे स्टेशनवर (Raipur Railway Station) उभ्या असलेल्या एका ट्रेनमध्ये अचानक स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, CRPF च्या २११ व्या बटालियनचे जवान विशेष रेल्वेनं जम्मूला जात होते. रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर उभी होती. त्याच दरम्यान हा स्फोट झाला. CRPF नं दिलेल्या माहितीनुसार, डेटोनेटर बॉक्स फुटल्यानं हा अपघात झाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com