PHOTO/VIDEO : मुसळधार पावसामुळे 'या' राज्यामध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी, परीक्षा रद्द

PHOTO/VIDEO : मुसळधार पावसामुळे 'या' राज्यामध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी, परीक्षा रद्द

चेन्नई | Chennai

सध्या देशाच्या काही एकीकडे देशात थंडीचा कडाका (Cold Weather) वाढतआहे. तर दुसरीकडं दक्षिण भारतातील (South India) काही राज्यात पाऊस पडत आहे. हवामानात होत असलेल्या चढ उताराचा चांगलाच परिणाम दिसून येत आहे.

तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. चेन्नईत (Chennai) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळील दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाबरोबरच काही डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुद्धा होत आहे.

येत्या ४८ तासांत पावसाचा जोर (Rain Alert) अधिकच वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेता TNDTE ने GTE परीक्षा रद्द केली आहे. आता या परीक्षा १९ आणि २० नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. याठिकाणी शासनाने सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com