सुकन्या योजनेत बदल

पालकांना दिलासा
सुकन्या योजनेत बदल

नवी दिल्ली - नागरिकांची लॉकडाऊन कालावधीत झालेली गैरसोय दूर करण्यासाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजनेत महत्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार लॉकडाऊनमध्ये 25 मार्च ते 30 जून 2020 या काळात वयाची 10 वर्षे पूर्ण केलेल्या मुलींचे 31 जुलै 2020 पर्यंत सुकन्या समृद्धी योजनेत नवी खाते सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या अल्पबचत योजनांमध्ये सध्या सुकन्या समृद्धी योजनेत सर्वाधिक 7.6 टक्के व्याज देण्यात येत आहे. या योजनेत वयाची 10 वर्षे पूर्ण झालेल्या मुलींचे खाते सुरू करता येते. मात्र करोना संकटात देशव्यापी टाळेबंदीत हजारो पालकांना या योजनेत मुलींची नवीन खाती सुरू करता आली नव्हती. याबाबत केंद्र सरकारकडे या अडचणी गेल्यानंतर सरकारने वयाची अट शिथिल केली. या निर्णयाने पालकांना दिलासा मिळाला आहे. ते येत्या 31 जुलैपर्यंत मुलीचे सुकन्या समृद्धी खाते सुरू करू शकतील.

सुकन्या समृद्धी योजने योजनेत किमान 250 रुपये तर कमाल 1.5 लाख इतकी रक्कम प्रत्येक महिन्याला जमा करू शकता. गुंतवणुकीला आयकरातून सूट आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com