चांद्रयान मॉड्यूलच्या लँडिंग वेळेत बदल; इस्रोने दिली महत्वाची अपडेट

चांद्रयान मॉड्यूलच्या लँडिंग वेळेत बदल; इस्रोने दिली महत्वाची अपडेट

मुंबई | Mumbai

भारताच्या चांद्रयान मोहिमेने (Chandrayaan-3 Mission) अवघ्या जगाचे लक्ष वेधले आहे. चांद्रयानने आत्तापर्यंत सगळे टप्पे यशस्वीरीत्या पार केले आहे. जे काम अमेरिका, चीन आणि रशिया जमले नाही ते काम आता इस्रोचे शास्त्रज्ञ (ISRO) करणार आहेत.

दरम्यान, आजच्या सॉफ्ट लँडींगबाबत इस्रोने महत्वाची माहिती दिली आहे. आज सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी विक्रम लँडरसाठी सॉफ्ट लँडिंगचा टप्पा महत्वाचा असणार आहे. दरम्यान चांद्रयान-३ चे मॉड्यूल आजच चंद्रावर वेळआधीच उतरणार आहे अशी माहिती इस्रोने ट्वीट करून दिली आहे.

इस्रोने ट्वीट करत म्हटले की, ऑटोमॅटिक लँडिंग सिक्वेन्स (ALS) सुरू करण्यासाठी सर्व तयार झाली आहे. चांद्रयान-३ मधील लँडर मॉड्यूल (LM) संध्याकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. ऑटोमॅटिक लँडिंग सिक्वेन्सकडून कमांड प्राप्त केल्यावर लँडर मॉड्यूल पॉवर्ड डिसेंटसाठी थ्रोटल करण्यायोग्य इंजिन सक्रिय करणार आहे. मिशन ऑपरेशन्स टीम कमांड्सच्या अनुक्रमिक अंमलबजावणीची पुष्टी करत राहील. चांद्रयान-३ चे थेट प्रक्षेपण संध्याकाळई ५ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com