
मुंबई | Mumbai
चांद्रयान-३ (Chandrayaan-3) बाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) हे चंद्रावर कशा प्रकारे उतरले, याचा व्हिडिओ इस्रोने शेअर केला आहे. एक्स पोस्टमधून इस्रोने (ISRO) ही माहिती दिली आहे. रोव्हर आता कामाला लागले असून चंद्रावरील गुढ गोष्टींचा शोध आता त्याने सुरु केला आहे. चंद्रावर काही सेकंदाआधी उतरण्यापूर्वीचा लँडरचा व्हिडीओ घेतला आहे. हा व्हिडीओ इस्रोने ट्विटरवर शेअर केला आहे.
दरम्यान, काल (२४ ऑगस्ट) रात्री देखील इस्रोने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. लँडर मॉड्यूल हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या थोडा पूर्वीचा हा व्हिडिओ होता. याच व्हिडिओच्या थ्रेडमध्ये इस्रोने आज नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे.
आता हे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाची रासायनिक रचना कशी आहे ते तपासण्याचे काम करत आहे. पुढील काही दिवसांत चंद्रावरील माती आणि खडक यांचे परीक्षण होणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा पहिलाच देश आहे. त्यामुळे प्रज्ञान रोव्हर १४ दिवस जे फोटो पाठवेल आणि निरीक्षण करेल ते संपूर्ण जगासाठी फायद्याचे ठरणार आहे.
दरम्यान, चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे फत्ते करून भारताने नवा इतिहास रचला आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिलाच देश ठरण्याचा विक्रम भारताच्या नावे झाला आहे. चांद्रयान-३ हे चंद्रावर १४ दिवस विविध प्रकारचे संशोधन करणार आहे.
चंद्रयान - ३ पृथ्वीवर कधी परतणार
चंद्रयान - ३ विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर दोन्हीही पृथ्वीवर केव्हा परतणार का तिथेच राहणार हा प्रश्न प्रत्येक सर्वसामान्यांच्या मनात येत आहे. मात्र यावर मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्ञान रोव्हर किंवा लँडर म्हणजेच चांद्रयान तीनमधील कोणताही पार्ट पृथ्वीवर परतणार नाही. १४ दिवस माहिती दिल्यानंतर १५ व्या दिवशी आणि त्यानंतर देखील हे यान आहे तिथेच म्हणजे चंद्रावरच राहणार आहे.